Posts

विचारमंथनाचा आनंद

आपण माणूस आहोत. म्हणजे आपण विचार करतो. समजा विचार करणे सोडून दिले तर आपण माणूस म्हणून राहू शकणार नाही.  घडलेल्या, घडत असलेल्या आणि पुढे घडू शकतील अशा कित्येक बाबींविषयी विचार केला पाहिजे. अन्यथा माणूस असण्याची प्रक्रिया बंद पडेल.  शिवाय विचार करताना एका सरळ रेषेत तो केला तर हाती काहीच उरणार नाही. वेगवेगळ्या बाजूने विचारमंथन व्हायला पाहिजे. असे झाले तर विचाराची मौज जगता येईल. सहजीवनाची सुरुवात ही विचारमंथनातून झाली तर आणखी मौज येईल. 
Recent posts